भारत विजयापासून फक्त दोन पाऊले दुर

29 Dec 2018 15:32:54


 


मेलबर्न : दुसऱ्या डावांमध्ये भारताची पडझड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघही गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. भारताचा दुसरा डाव १०६वरती घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ३९९ धावांचे लक्ष्य दिले. त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ बाद २५८ अशी स्थिती होती. पॅट कमिन्सच्या खेळीमुळे भारताचा विजय लांबणीवर पडला आहे. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी १४१ धावांची तर भारताला हा सामना आपल्या नावे करण्यासाठी फक्त २ विकेटची आवश्यकता आहे.

 

शॉन मार्श (४४) आणि पॅट कमिन्स (६१) वगळता अन्य कांगारू फलंदाज भारताच्या वेगवान माऱ्यासमोर निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट घेतलेत. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २ विकेट गारद केलेत. चौथ्या दिवशी भारताने तिसऱ्या दिवशीच्या ५ बाद ५४ धावांवरुन सुरुवात करताना आज १०६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने धारदार गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या तर हेजलवूडनेही २ विकेट्स मिळवल्या. भारताने पहिल्या डावातील २९३ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या १०६ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियासमोर ३९९ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0