मुंबईत कमला मिलजवळच्या इमारतीला आग

29 Dec 2018 11:59:08

 

 
 
 
मुंबई : परळमधील ऑर्बिट टेरेस या उंच इमारतीला आज सकाळी आग लागली. कमला मिल कंपाऊंडसमोरच ही इमारत आहे. ऑर्बिट टेरेस या इमारतीचे सध्या बांधकाम सुरू होते. अग्निशमदलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या इमारतीमध्ये अडकलेल्या ५ बांधकाम मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
 

सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. ऑर्बिट टेरेस या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर शॉकसर्किट झाल्यामुळे तेथील लाकडी सामानाने पेट घेतला. धुराचे लोट उसळू लागले. अग्निशमनदलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. साडेआठ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे कळते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
Powered By Sangraha 9.0