ठाण्यात सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू

25 Dec 2018 12:57:54


ठाणे : ठाण्यामध्ये आंबेडकर रोडच्या एका चाळीमधील घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. संदीप काकडे, असे घरमालकाचे नाव असून काकडे कुटूंबातील पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचाही सामावेश आहे.

 

सर्व जखमींना ऐरोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपस्थितांनी दिली. शेजारील राहणारी कांताबाई वानखडे (वय ५५) यांच्या अंगावर भिंत पडली होती. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलासह पोलिसांनी मदत कार्य सुरू केले आहे. घटनास्थळी खा. राजन विचारे आणि आ. प्रताप सरनाईक पोहोचले आहेत. काकडे आणि वानखडे यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासन यांना कळवले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0