वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद पाचोरा तालुक्याची नूतन कार्यकारिणी

24 Dec 2018 14:03:19

 
 
पाचोरा : 
 
तालुक्याची महत्त्वाची बैठक येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभागीय अध्यक्ष तेजस पाटील यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष चेतन तांगडे यांच्या सहमतीने पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणी गठीत करून नवीन युवकांची तसेच अनुभवी पदाधिकार्‍यांची नावे जाहीर करण्यात आली.
 
 
यावेळी वि.भ.वि.प. जिल्हाउपाध्यक्ष सचिन माळी, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील, संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष रविंद्र देवरे यांची उपस्थिती होती.
 
 
नवीन कार्यकारिणीत पाचोरा तालुकाध्यक्षपदी योगेश पाटील, ता.उपाध्यक्षपदी पंकज चौधरी, कार्याध्यक्ष गणेश पांढरे, तालुका संघटकपदी आकाश पाटील, प्रसिध्दी प्रमुख गणेश शिंदे तसेच शहराध्यक्षपदी मनोज पाटील, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
 
 
त्याचबरोबर आजी तालुकाध्यक्ष असलेले पंकज रेणुके यांची जळगांव जिल्हा संघटकपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यातून काम करणार्‍याला संधी नक्की देण्यात येते ही आपली ओळख निर्माण करण्यात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यशस्वी झाली आहे. बैठकीत नवीन सदस्यांना परिषदेचे ध्येय, उद्दिष्ट समजरवून सांगण्यात आले. यावेळी वर्षभराचा कार्यप्रणाली व कामाचा आराखडा मांडण्यात आला.
 
 
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड,पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व तत्सम 32 कक्षांकडून तसेच तालुक्यातील सर्व स्तरांवरून नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या.
Powered By Sangraha 9.0