चोरवड यात्रोत्सव आनंदात पार पाडू

24 Dec 2018 14:08:40

शांतता समितीच्या बैठकीत पो.नि. सचिन सानप यांची ग्वाही

 
 
पारोळा :
 
तालुक्यातील चोरवड येथील यात्रोत्सव पंचक्रोशीत सर्वात मोठी यात्रा समजली जाते. या यात्रोत्सवाला कुठलेही गालबोट लागू देणार नसल्याची ग्वाही पो.नि. सचिन सानप यांनी चोरवड येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिली.
 
 
चोरवड यात्रोत्सवात यावर्षी सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवकांसह महिला पोलीस अधिकारी, होमगार्ड, पोलीस महिला व पोलीस कर्मचार्‍यांचा तगडा बंदोबस्त लावून शांततेने यात्रोत्सव पार पाडणार असल्याचे सांगितले.
 
 
गेल्यावर्षी यात्रोत्सवात एकही चोरी किंवा भांडण होऊ दिले नाही. त्यासाठी गावकर्‍यांचे सहकार्य लाभले होते. त्यात स्वयंसेवक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे चोरट्यांवर वचक बसला होता.तसेच नियोजन करून सर्वांच्या सहकार्याने श्रीदत्त यात्रोत्सव पार पाडण्याचे आवाहन उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी केले.
 
 
यात्रोत्सवात गावाचे शंभर टक्के सहकार्य असते. त्याव्यतिरिक्त वैयक्तिक मतभेद असतील तर ते विसरून प्रत्येकाने सहकार्य करावे, असाही ते म्हणाले.
 
 
जि.प.सदस्य डॉ. हर्षल माने यांनी जिल्हा परिषदेच्या तीर्थक्षेत्र शेष निधीतून चार लाख मंजूर करून श्री दत्त मंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असल्याचे सांगितले.
 
 
यावेळी शिरसमणीचे सरपंच सुदाम पाटील, टिटवी सरपंच गुलाब पाटील, शालेय समिती अध्यक्ष प्रल्हाद कुंभार, माजी सरपंच रतन पाटील, विकासोचे चेअरमन भालेराव पाटील, चोरवड उपसरपंच मधुकर पाटील, नाना पाटील, अरुण पाटील, सुधाकर पाटील, दीपक पाटील ,गोविंदा नाव्ही, भीमा पवार, निंबा पाटील, मल्हार कुंभार, ग्रामसेवक सूर्यवंशी ,पो.हे.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ.सुनील साळुंके, विजय शिंदे,आशिष चौधरी, काशिनाथ पाटील, कैलास पाटील, सुनील पवार, दीपक अहिरे, कैलास शिंदे, रवी कुंभार, उल्हास पाटील यांच्यासह ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. डॉ. हर्षल माने,अ‍ॅड. भूषण माने, सरपंच स्मृती माने, उपसरपंच रमेश पाटील यासह सदस्य, ग्रामस्थ परिश्रम घेत आहे. सूत्रसंचालन संदेश माने यांनी तर आभार मल्हार कुंभार यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0