भुसावळला सीएम चषकचे उद्घाटन

24 Dec 2018 10:28:14

 
 
भुसावळ : 
 
सीएम चषकातील क्रिकेट स्पर्धेला रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरवात झाली. या स्पर्धेत तालुक्यातील तब्बल 52 संघांनी सहभाग नोंदवला आहे. आमदार संजय सावकारे यांनी फलंदाजी करुन या स्पर्धांना सुरवात केली.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवारी आमदार संजय सावकारे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष तथा सीएम चषकाचे संयोजक अनिकेत पाटील, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गिरीष महाजन, नगरसेवक किरण कोलते, पाणीपुरवठा सभापती राजू नाटकर, राजू खरारे, प्रमोद सावकारे आदी उपस्थित होते.
 
या स्पर्धेत सकाळी मॉर्नींग क्रिकेट क्लब व स्वराज क्रिकेट क्लब यांच्यात पहिला सामना झाला. स्वराज संघाने 32 धावांचे लक्ष पूर्ण करुन विजय मिळवला. स्टार व टीएसकेसीसी या संघात झालेल्या दुसर्‍या सामन्यानत टीएसकेसीसीने 40 धावांचे लक्ष पूर्ण करुन विजय मिळवला.
 
तिसर्‍या सामन्यात 420 सीसी व हिंदू सूर्य संघात चुरस निर्माण झाली.हिंदू सूर्यने हा सामना 40 धावा काढून जिंकला, चौथ्या सामन्यात टीएसकेसीसी व स्वराज संघात झाला यात स्वराज संघाने 52 धावा काढून बाजी मारली.
 
 
पाचव्या सामन्यात ब्यू चास्लरल व स्टूडंट क्रिकेट क्लबमध्ये झाला यात स्टूडंट क्रिकेट क्लबने 59 धावांचे लक्ष पूर्ण करुन सामना जिंकला. पंच म्हणून नसीर शेख, तोसिफ मिर्झा, वसीम खान, अझीम खान आदींनी कामकाज पाहिले.
Powered By Sangraha 9.0