साईभक्तांवर काळाचा घाला ; ४ ठार

23 Dec 2018 17:48:22



नाशिक : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याजवळ दिंडीत स्विफ्ट घुसल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जण ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. मुंबईमधील कांदिवली पूर्व येथील साईराम पालखी शिर्डीकडे पायी जात असताना हा अपघात झाला. जखमी साईभक्तांना सिन्नर येथील नजिकच्या रुग्णालयात तर काही जखमींना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

मुबंईतील कांदिवली, समतानगर येथील साईराम पालखी शिर्डीकडे पायी निघाली होती. ही पालखी सिन्नर शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याच्यापुढे पोहोचली होती. तेव्हा भरधाव वेगात आलेली स्विफ्ट कार थेट पालखी घुसली आणि पालखीत चालत असलेल्या २० ते २२ साईभक्तांना कारने जोराची धडक दिली. कार चालकाला समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटमुळे काहीच न दिसल्याने गाडी सरळ पालखीतील भाविकांना चिरडत गेली. पालखीसोबत २५ फुटी देखावा असलेल्या रथालाही गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेने काही भाविक रस्त्याच्या कडेला शेतात फेकले गेले, तर काही जण जखमी अवस्थेत महामार्गावर पडले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0