पाचोर्‍यातील हिवरा नदीवरील ब्रिटिशकालीन दगडी पूल जमीनदोस्त

22 Dec 2018 12:20:36

 
पाचोरा :
 
जळगाव ते नांदगाव राष्ट्रीय मार्ग क्र.753 या रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू असून जळगाव ते भडगावदरम्यान पाचोर्‍यातील हिवरा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन 60 वर्ष पूर्वीचा दगडी पूल हा गुरुवारपासून कर्मचार्‍यांसह पोकलँडने तोडण्यास सुरुवात झाली आहे.
 
पूल हा जमीनदोस्त करण्यात आला आहे. ब्रिटिश काळापासून दगडात बांधण्यात आलेल्या या पुलावरून रहदारीसह छोटे-मोठे वाहन जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, नांदगाव, जामनेर, मालेगाव जात होते.
 
 
पूर्वी हा रस्ता 7 मीटर रुंद असा होता. आता हा रस्ता 10 मीटर रुंदीचा करण्यात येत आहे तर पूल हा 14 मीटर रुंदीचा बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
भविष्यात रस्त्याविषयी काही समस्या मांडावयाच्या झाल्यास कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न नागरिकांना आतापासून पडला आहे. कारण राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय हे धुळे येथे आहे.
 
जळगावपासून ते भडगावपर्यंत सन एंटरप्राइजेस औरंगाबादचे प्रो.याकूब पटेल व शेख शेरू यांनी या मार्गावरील पूल तोडण्याचा ठेका घेतला असून 20 रोजी सकाळपासून पोकलँडसह कर्मचार्‍यांनी पूल तोडण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
 
 
रस्त्याची व पुलाची कामे सुरू असल्याने वाहतूक दोन्ही बाजूने वळविण्यात आली आहे. येत्या 6 महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0