सिद्धार्थने जपले सामाजिक भान

    दिनांक  22-Dec-2018


 
 
 
 

बीडच्या अनाथ मुलांना केली आर्थिक मदत

 

बीड : अभिनेता सिद्धार्थ जाधव याने बीड येथील ‘सहारा’ या अनाथआश्रमातील निराधार मुलांना आर्थिक मदत करून सामाजिक भान जपले आहे. ‘सहारा’ या अनाथआश्रमात एकूण ८५ अनाथ मुले राहतात. संतोष गर्जे यांनी १४ वर्षांपूर्वी ‘सहारा’ या अनाथ आश्रमाची स्थापना केली होती. सहारा या अनाथ आश्रमाद्वारे संतोष गर्जे यांनी अनेक वंचित मुलांची मदत केली.

 
त्यांना राहायला आसरा मिळवून दिला. गेल्या १४ वर्षांपासून ते हे कार्य करत आहेत. या सामाजिक कार्यासाठी संतोष गर्जे यांचा अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात संतोष गर्जे यांनी आपली आत्मकथा आणि सहारा या अनाथ आश्रमातील मुलांची व्यथा मांडली. हे ऐकून सिद्धार्थ भावूक झाला. सिद्धार्थने सर्वांसमोर या कार्यक्रमात ‘सहारा’मधील अनाथांसाठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.
 

बीडमधील पाटसरा या दुर्गम भागातील ऊसतोडणी कामगाराच्या घरात जन्माला आलेल्या संतोष गर्जे याचा मला अत्यंत अभिमान वाटत आहे. आपल्या वयाच्या १९ व्या वर्षापासून संतोष अनाथ मुलांसाठी काम करतो. सहारामध्ये ८५ निराधार मुले आहेत. या अनाथ मुलांसाठी मी माझा खारीचा वाटा उचलतो. मी जी आर्थिक मदत केली, ती संतोषने केलेल्या कार्यापुढे फार लहान आहे.

 
    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/