बोदवडला शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेचे आज उद्घाटन

21 Dec 2018 11:30:21
बोदवड :
 
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री चषकअंतर्गत शेतकरी सन्मान कबड्डी स्पधचा शुभारंभ 21 शुक्रवार रोजी सकाळी 8:30वाजता स्व. निखिलभाऊ खडसे व्यायामशाळा प्रांगण मनूर रोड, बोदवड येथे होणार आहे.
 
 
अध्यक्षस्थानी माजी महसूल कृषिमंत्री आ. एकनाथराव खडसे, उद्घाटक रावेर लोकसभा मतदारसंघ खा. रक्षाताई खडसे, जेडीसीसी बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते होणार आहे.
 
 
प्रमुख बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष आमिर साहेब, जि.प.उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, जिल्हा भाजप संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, माजी जि.प. उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगर पं.स सभापती शुभांगीभोलाने, पं.स सभापती गणेश पाटील, रावेर पं.स. सभापती शुभांगी नेमाडे, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, बोदवड नगराध्यक्षा मुमताज बी. बागवान, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विलास धायडे, जिल्हा भाजपा चिटणीस राजू माळी, जिल्हा भाजपा चिटणीस कैलास चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले, सहक्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, मुक्ताईनगर भाजपा तालुकाध्यक्ष दशरथकांडेलकर, बोदवड भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, रावेर भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, अभियान संरक्षक संदीप देशमुख, अभियान संयोजक ललित महाजन तसेच सर्व जि प सदस्य, पं स सदस्य, नगरसेवक, सरपंच, लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. उद्घाटन सोहळ्यास सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे
Powered By Sangraha 9.0