राज्य सरकारचा मोठा निर्णय : कांदा उत्पादकांना दोनशे रुपये अनुदान

20 Dec 2018 14:26:53
 
 

मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्य़ांना यामुळे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. कांदा वाहतूकीसाठी अनुदान देण्यावर आणि कांद्यावर प्रक्रीया करता यावी यासाठी राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

 

कर्जवसुली थांबणार

 

नवीन विधानसभा अस्तित्वात येईल तोवर कर्जवसुली थांबवावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप हंगाम २०१८मधील कर्जवसुलीला ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.


 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
Powered By Sangraha 9.0