जिना हाऊस बनणार इंटरनॅशनल सेंटर

20 Dec 2018 13:20:52
 
 

मुंबई : दिल्लीतल्या हैदराबाद हाऊसारखेच मुंबईतल्या जिना हाऊसचेही इंटरनॅशनल सेंटर करण्याबाबत विचार सुरू आहेत. उच्चस्तरीय परदेशी शिष्टमंडळ भारत भेटीला येणाऱ्या विशेष पाहुणे, द्विपक्षीय चर्चेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी भोजनाचा कार्यक्रम दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये होतो.

 

मुंबईतील जिना हाऊसचाही असा वापर करण्यात येणार आहे. मलबार हिल येथे असणारे जिना हाऊस कायदे-आजम यांचे घर असल्याचा दावा पाकिस्तानने वेळोवेळी केला आहे. पाकिस्तान याला वाणिज्य दूतावास करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र मलबार हिल येथील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा गेल्या सात वर्षापासून जिना हाऊस सांस्कृतिक केंद्र बनवण्याची मागणी करत असल्याने लोढा यांनी हे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत नेले आहे.

 

मोहम्मद अली जिना यांनी१९३६ मध्ये मुंबई येथील मलबार हिल येथे ही वास्तू उभारली. त्याकाळात ही इमारत बनवण्यासाठी २ लाखांचा खर्च आला होता. साऊथ कोर्ट म्हणून ओळखली जाणारी ही इमारत अडीच एकर परिसरात वसलेली आहे. वास्तूनिर्मितीसाठी भारतीय गॉथिक शैलीचा मिलाफ करण्यात आला आहे.

 

आ. लोढा म्हणाले कि, ही वास्तू विकसित करून नवी सुधारणा करण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयातून सूचना मिळाल्या आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. वास्तू परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्त करण्यासंबंधी मंजूरीही मिळाल्याने लवकरच हे इंटरनॅशनल सेंटर होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0