वरळी दूरदर्शन केंद्राला आग

20 Dec 2018 11:53:02
 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अंधेरीतील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर गुरुवारी सकाळी वरळी दूरदर्शन केंद्रातील दुसऱ्या मजल्याला आग लागली. या दरम्यान साऱ्यांचीच एकच धावपळ झाली. आगीमुळे एफएमचे प्रसारण तत्काळ बंद करण्यात आले आहे.

 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणली. बुधवारी सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. वरळी दुरदर्शन केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली.

 

आगीचा फटका बसल्याने एफएमचे प्रसारणही बंद करण्यात आले. मुंबई महापालिका अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दूरदर्शन केंद्रातील दुसऱ्या मजल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास सुरू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0