जारगाव चौफुलीजवळील नाल्याच्या साफसफाईला अखेर मुहूर्त गवसला

20 Dec 2018 12:08:49

पाचोरा न.पा.च्या आरोग्य विभागातर्फे जेसीबीने साफसफाईला सुरुवात

पाचोरा : 
 
पाचोर्‍यातील जारगाव चौफुली जवळील नाल्याच्या साफसफाईअभावी सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने व सांडपाण्याचा परिसरातील घरांना वेढा पडत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
 
 
याबाबत मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ दखल घेऊन आरोग्य विभागास फोन करून आरोग्य अधिकारी धनराज पाटील व भिकन गायकवाड यांना नाल्याची जेसीबीद्वारा साफसफाई करण्यासंदर्भात आदेश दिला.
 
 
मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी धनराज पाटील व भिकन गायकवाड यांनी जेसीबीसह ट्रॅक्टर व सफाई कामगार घेऊन जाऊन जारगाव चौफुलीजवळील नाल्याची बुधवारी जेसीबीद्वारा नाल्याची साफसफाईला सुरुवात केली.
 
 
गेल्या काही वर्षापासून नाल्याची साफसफाई न झाल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर घनकचरा व गाळ साचलेला होता. जेसीबीच्या साहाय्याने या नाल्यातील गाळ व घनकचर्‍याची साफसफाई बुधवारी रोजी करण्यात आली.
 
 
या नाल्याची मागील काळात पावसाच्या पाण्याने भिंत पडल्याने अद्याप बांधण्यात आली नसून या भिंतीचेही बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0