बोहरा स्कूलच्या विद्यार्थ्यांची विज्ञान मंथन परीक्षेत जिल्हास्तरावर निवड

20 Dec 2018 13:05:17

 
 
पारोळा : 
 
सीबीएसई बोर्डअंतर्गत घेण्यात आलेल्या विज्ञान मंथन परीक्षेत बोहरा सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यानी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने जिल्हास्तरावर प्राविण्य प्राप्त केले आहे.
 
 
परीक्षेत ह्यावर्षी प्रथम सहभाग नोंदवला असून एकूण 83 विद्यार्थ्यानी ज्युनियर व सिनियर गटात सहभाग नोंदवला. 25 ते 28 ऑक्टोबरपर्यंत मोबाईलद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.
 
 
परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात ज्युनियर गटात इयत्ता 6 वीचा ऋषिकेश गढरी, नूपुर सूर्यवंशी, प्रणव महाजन इयत्ता सातवीचा त्रिनेश पवार इयत्ता आठवीचा लोकेश जैन तर सिनियर गटात इयत्ता नववीचा पीयूष चंदे, सर्वेश बाहेती, भूवन पाटील, इयत्ता दहावीचा प्रतीक जैन, पुष्कर देवरे, जयेश सावकारे या विद्यार्थ्यांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीत क्रमांकाने जिल्हास्तरावर विद्यार्थ्याची रवींद्र मोहन मल्होत्रा या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, प्राचार्या शोभा सोनी, पर्यवेक्षक विरेन सखा तसेच शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी अभिनंदनासह कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0