जगतगुरु डॉ.राजेंद्रदास महाराज यांची शोभायात्रा जल्लोषात

02 Dec 2018 11:14:23
 
 
जळगाव : 
 
येथील कुंदन फाउंडेशनतर्फे जळगाव बांभोरी पुलाजवळ, जलाराम बाप्पानगरात 8 डिसेंबरपर्यंत वृंदावन धामचे पिठाधीश्वर तथा जगतगुरु डॉ.राजेंद्रदास महाराज यांचे भागवत कथा सप्ताह होत आहे.
 
शनिवार, 1 रोजी त्यांचे जळगावात रेल्वे स्टेशनला कुंदन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पी.के.पाटील यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी ना. गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आ. सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निबांळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, प्रा. डी.डी. बच्छाव, पी.ई तात्या पाटील, उद्योगपती विजू काबरा, जिल्हा बॅक कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, डॉ.किशोर पाटील, डॉ.राजेंद्र सरोदे, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.संजय महाजन, गायत्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सकाळी भव्य शोभायात्रा रेल्वे स्टेशन ते आकाशवाणीपर्यंत काढण्यात आली. शोभायात्रेत 100 मोटारसायकलस्वार 50 वारकरी भंजनी मंडळ 50 महिला भगिनी आणि 100 साधूसंत आणि भाविक मंडळीची उपस्थिती लक्षणीय होती.
Powered By Sangraha 9.0