नवी दिल्ली : जागतिक पातळीवर युट्युबचा वापर हा सगळ्यात जास्त केला जातो. हे व्हिडिओ पाहण्याचे व स्वतःचे व्हिडिओ जगासमोर आणण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. जगभरातले लोकांना स्वतःच्या इच्छेनुसार कोणताही व्हिडिओ अपलोड करण्याचे आणि पाहण्याचे स्वातंत्र्य होते. परंतु या साईटने तब्बल ७८ लाख व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहे.
युट्यूबने जुलै ते सप्टेंबर दरम्यानचे काही व्हिडिओ डिलीट केले आहेत. आक्षेपार्ह मजकुरामुळे इतके व्हिडिओ डिलीट करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. युट्यूब कम्युनिटी गाइडलाईन्स एंफोर्समेंटने दिलेल्या माहितीनुसार, ७८ लाख व्हिडिओमधील ८१ टक्के व्हिडिओ सिस्टीमद्ववारे डिलीट करण्यात आले आहेत. डिलीट केलेले ७४.५ टक्के व्हिडिओ पाहिले गेलेले नाहीत. त्यांचा या कारवाईमुळे पायरसी, आक्षेपार्ह गोष्टी तसेच समाज दूषित करणाऱ्या गोष्टींवर आळा बसेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
यूट्यूबच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले की, "आम्ही एक व्हिडिओ असा पाहिला ज्यात नियमांचे उल्लंघन गेले होते. तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे आणि अपलोड केलेल्या चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यात ९० टक्केपेक्षा अधिक व्हिडिओ हे बाल सुरक्षा आणि वादग्रस्त कारणास्वत डिलीट करण्यात आले आहेत. डिलीट करण्यात आलेले व्हिडिओ १० पेक्षा कमी लोकांनी पाहिले होते." केवळ व्हिडिओ नव्हे तर युट्यूबने युट्यूबवरील सबस्क्राबर्स कमी करण्यास सुरूवात केली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/