महाराष्ट्र गारठला; धुळ्यात नीचांकी तापमान

19 Dec 2018 13:35:22


 


मुंबई : गेले काही दिवस मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ५ अंश सेल्सियस एवढी नोंद झाली आहे. गेल्या २७ वर्षातील हे नीचांकी तापमान असल्याचे हवामान खात्याने सांगितले. इतर राज्यातही थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येतात. धुळे जिल्ह्यामध्ये यापूर्वी सर्वात नीचांकी तापमानाची नोंद ३ जानेवारी १९९१ या दिवशी २.३ अंश सेल्सियस एवढी झाली होती. त्यानंतर तब्बल २७ वर्षांनी हा पारा ५ अंशाच्या खाली आला आहे.

 

मुंबई-पुण्यातही थंडीचा जोर कायम आहे. मुंबईत थंड वाऱ्याची लाट आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकर मात्र या गुलाबी थंडीची मजा लुटताना दिसत आहेत. औरंगाबाद, नाशिक, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पारा कमालीचा खाली आला आहे. शहरातील थंडीचा पारा १ अंश सेल्सिअसने घरसला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर गारठा जाणवला. समुद्रातील वादळी वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे, वाऱ्यांचा वेग वाढला असून, येत्या काही दिवसांत थंडीचा पारा आणखी घसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0