भांडवली बाजार तेजीवर स्वार

18 Dec 2018 17:53:48
 
 

मुंबई : मेटल, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील चौफेर खरेदीमुळे आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स ७७ अंशांनी उसळत ३६ हजार ३४७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १० हजार ९०८.७० च्या स्तरावर बंद झाला.

 

आयटी शेअरमध्ये झालेल्या जोरदार विक्रीचा सपाटा दिसून आला. अमेरीकेतील शेअर बाजारांमध्ये पडझड झाल्यामुळे आयटी शेअर घसरले. दरम्यान इन्फोसिस २.५१ टक्के, निट टेक २.८५, टेक महिंद्रा १.५५ टक्क्यांनी घसरले. विप्रो १.३५ टक्के आणि टीसीएसमध्ये ०.३२ टक्के घसरण झाली. कच्च्या तेलाची दर वाढ आणि आयटी शेअरमधील घसरणीमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत ७० पैशांनी घसरून ७०.८४ च्या स्तरावर कामगिरी करत होता.

 

निफ्टी ऑक्टोबरनंतर सर्वाधिक वधारणीसह बंद झाला. निफ्टीमध्ये पब्लिक सेक्टर बॅंकांचे शेअर १.३ टक्क्यांनी वधारले. युनियन बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, सिंडीकेट बॅंक ३ टक्क्यांनी पंजाब नॅशनल बॅंक २.१, एसबीआय १.५ टक्क्यांनी वधारले. अर्थविश्लेषकांनी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने अमेरिकेतील बाजारांवर मंगळवारी तणाव दिसून आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0