वडार समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणार

    दिनांक  17-Dec-2018 
 
सोलापूर : “वडार सामाजाने देशभरात विश्वकर्माचे काम केले आहे. वडार समाजाच्या भरवशावर देशाची निर्मिती झाली. परंतु आज त्यांच्यातील बहुतांश समाज हा हलाखीचे जीवन जगत आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच “पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथ आम्ही वडार समाजाशिवाय कसा पुढे नेणार?" असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सोलापूरमध्ये झालेल्या वडार समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 

स्वातंत्र्यपूर्वी काळात इंग्रजांनीही वडार समाजावर बंधने टाकली होती. परंतु वडार समाज हा आक्रमक राहिला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वडार सामाजाने योगदान दिले आहे. गेल्या ७० वर्षांपासून वडार समाज समस्यांना तोंड देत आहे. वडार समाजाच्या वेदना त्यांचे दु:ख करणे हे आमचे कर्तव्य आहे. इदाते समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब झाल्यास वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले हे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. आपण सर्वजण वडार समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. वडार समाजातील बेघरांना घरे देऊ. वस्त्यांची जागा वडार समाजाच्या मालकीची होईल अशी व्यवस्था करू. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

 
 
 
 
 
 
सरकार वडार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. वडार समाजातील होतकरू तरुणांसाठी, समाज भूषणांसाठी ज्या काही आवश्यकता त्यासाठी राज्य सरकार वडार समाजाच्या पाठीशी असेल. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला दिले. सरकार आणि समाजा यांमध्ये एक व्यवस्था उभी राहावी. ही व्यवस्था सरकारचे सर्व निर्णय समाजापर्यंत पोहोचवेल. असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र समन्वय समितीची घोषणा केली. तसेच विजय चौगुले हे या समन्वय समितीचे अध्यक्ष असतील. असे म्हणत विजय चौगुले यांना राज्यमंत्री म्हणून जाहीर केले.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/