बाजार समितीच्या संचालकांनी आणलेल्या निकालास सहकार मंत्र्यांकडून स्थगिती

15 Dec 2018 13:34:04

पाचोरा : 
 
पाचोरा बाजार समितीने तत्कालीन संचालक प्रताप हरी पाटील, पंढरीनाथ गोविंद पाटील व गणेश सुमेरसिंग पाटील यांनी 2011 ते 2012 या कालावधीत गैरव्यवहार केल्याचे सिध्द झाल्यामुळे यांच्याविरुद्ध 50 लाख 72 हजार 156 रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित केली.
 
सदर रकमेचा भरणा न केल्यामुळे कलम 41 (3) अन्वये सतीश परशुराम शिंदे (सभापती) यांच्या तक्रारी अर्जावरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी 7 मार्च रोजी तीनही संचालकांना अपात्र घोषित केले होते.
 
सदर निर्णयाविरुद्ध सहसंचालक (पणन) पुणे यांच्याकडे अपील केले असता 12 सप्टेंबर रोजी अपील मंजूर केले होते. सदर निर्णयाविरुद्ध सभापती सतीश शिंदे यांनी 10 डिसेंबर रोजी ना. सुभाष देशमुख सहकार व पणन यांच्याकडे अपील केले.
 
 
12 नोव्हेंबर रोजीच्या आदेशास स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे अपात्र संचालकांना बाजार समितीत घेण्याचे दरवाजे पुन्हा बंद झाले आहेत.
 
 
थकबाकीदार संचालकाविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही रद्द केल्यास बाजार समितीचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे सभापती सतीश शिंदे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून बाजार समितीचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी 11 डिसेंबरला स्थगिती दिलेली आहे.
 
 
सदर स्थगिती आदेशामुळे प्रताप हरी पाटील, पंढरीनाथ पाटील, मंगेश पाटील यांना बाजार समितीत संचालक म्हणून कामकाज करता येणार नाही.
 
 
पत्रकार परिषदेला सभापती सतीश शिंदे, उपसभापती अ‍ॅड. विश्वासराव भोसले, संचालक - सदाशिव पाटील, जि.प.सदस्य दशरथ काटे, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक बन्सीलाल पाटील, नरेंद्र पाटील, दिलीप पाटील, युवानेते अमोल शिंदे, धोंडू हटकर, शा गनी शा चांद, संचालिका सिंधुताई शिंदे, सुनंदा बोरसे, नीरज जैन, प्रिया संघवी, अनिता चौधरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0