विद्यार्थ्यांनी विमान प्रवासाने घेतला सहलीचा आनंद

15 Dec 2018 13:15:34

धरणगावच्या सारजाई कुडे, बालकवी ठोंबरे विद्यालयाचा उपक्रम



 
पाचोरा : 
 
 
बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई कुडे माध्यमिक विद्यालयाची सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील सहल 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत वेगवेगळ्या जगप्रसिद्ध, प्रेक्षणीय, उल्हासित व पाहण्याजोगी ठिकाणी उत्साहात झाली. सहलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी या सहलीत चक्क विमान प्रवासाने आपल्या सहलीचा आनंद लुटला.
 
 
सर्वांच्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण म्हणायला हरकत नाही. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी आनंदासोबत वेगवेगळ्या गोष्टींची माहितीही संकलित केल्याचे म्हटले.
 
 
या सहलीत त्यांनी दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, पटनी टॉप दिल्लीतील स्थळे - राजघाट, इंडिया गेट, लोटस टेम्पल, अक्षरधाम, संसदभवन, राष्ट्रपती भवन, बांगलासाहेब गुरूद्वारा, अमृतसरतील स्थळे-जालियनवाला बाग, सुवर्ण मंदिर अशा स्थळांना जाऊन सहलीचा आनंद काय असतो, तो अनुभवला.
 
 
या सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष हेमलाल शेठ भाटिया, सचिव प्रा.रमेश महाजन, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सर्व संचालक मंडळ, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
 
 
विद्यार्थ्यांना सहलीमध्ये प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, सहल प्रमुख ए.एच.पाटील, आर.जी.देवरे, व्ही.एल.मोरे, एस.व्ही.तारे, जे.एस.बोरसे, सागर पाटील यांनी मार्गदर्शन केले. सहल यशस्वितेसाठी शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.
 
 
विद्यार्थ्यांना या सहलीत विविध स्थळांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंदाबरोबर शिक्षणाची गोडीही दिसून आली.
Powered By Sangraha 9.0