माझी प्रकृती ठणठणीत : लता मंगेशकर

15 Dec 2018 19:40:52

 


 
 
 
मुंबई : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आजारी असल्याचे काही ट्विट्स सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. मात्र या अफवांना पूर्णविराम देत खुद्द लता मंगेशकर यांनी आपली प्रकृती ठणठणीत अससल्याची माहिती दिली. ट्विटरच्या माध्यमातूनच लता मंगेशकरांनी ही माहिती दिली. आपल्या चाहत्यांशी संवाद साधत त्यांनी आपल्या प्रकृतीची खुशाली कळवली.
 
 
 
 
 
 
वाचा संबंधित बातमी : अखेरच्या श्वासापर्यंत मी गात राहेन : लता मंगेशकर  
 

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. असे आवाहन खुद्द लतादीदींनीच आपल्या चाहत्यांना केले आहे. तसेच या ट्विटमार्फत त्यांनी आपल्या चाहत्यांशी संपर्क साधल्यामुळे अनेकांना मोठा दिला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी लतादीदी संगीत क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याच्या अफवादेखील उठल्या होत्या. त्यावेळीही लतादीदींनी ट्विट करून त्या संगीतातून कधीही निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
Powered By Sangraha 9.0