जारगावच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

14 Dec 2018 11:30:52

घरात आई-बहीण झोपेत असताना घडली घटना


पाचोरा : 
 
तालुक्यातील जारगाव येथील तरुण भावेश डिगंबर पवार (25) या तरुणाने गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेपूर्वी आपल्या राहत्या घरातील किचन रूममध्ये वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
 
हा प्रकार मृत तरुणाची आई रत्नाबाई व बहीण वृषाली हे पहाटे झोपेतून उठल्यावर लक्षात आल्याने मृत भावेश यास त्याचे मामा जगदीश किसन मराठे यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.
 
 
वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात माहिती दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावेशवर कवठळ ता.धरणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. तपास पो. नि. अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार चंद्रकांत पाटील करीत आहे.
भावेशच्या वडिलांची तीन वर्षांपूर्वी आत्महत्या
 
 
मृत भावेशचे वडील डिगंबर पवार यांनीही 3 वर्षांपूर्वी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजते. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृत भावेशचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेे.
Powered By Sangraha 9.0