डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरण : आरोपींना जामीन

14 Dec 2018 17:34:10
 
 

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर यांना न्यायालयाने शुक्रवारी जामिन मंजूर केला. मात्र, हे तीनही आरोपी पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणात अटकेत असल्याने त्यांना जामीन मिळूनही तुरुंगात राहावे, लागण्याची शक्यता आहे.

 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या काही महिन्यांनंतर आरोपींना पकडण्यात सीबीआयला यश आले. अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर याना सीबीआयने अटक केली. मात्र,  सीबीआयने तीन आरोपी अटक केल्यानंतर ९० दिवसांमध्ये न्यायालयात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते.

 

मात्र, त्यानंतरही दोषारोपपत्र दाखल झाले नाही. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढही मागितली नाही. हे कारण पुढे करत आरोपींच्या वकिलांनी तिघांना जामिन मंजूर करण्याबाबतचा अर्ज न्यायालयात केला होता. दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात या तिघांचा समावेश असल्याने त्यांना जामीन मिळूनही तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0