आज मध्यरात्री म.रे.चा ४ तासांचा ब्लॉक

13 Dec 2018 15:57:41


 


मुंबई : नवीन सिग्नल यंत्रणा आणि ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेच्या दादर- माटुंगा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आज (गुरुवारी) रात्री १२ वाजून ५० मिनिटे ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. यामुळे उपनगरीय सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.

 

ब्लॉकदरम्यान रात्री १२ वाजून १६ मिनिटे ते पहाटे ४.५६ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावरून चालविण्यात येतील. या उपनगरी गाडय़ा चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार स्थानकात थांबा देण्यात येईल. शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच दादर टर्मिनसमध्ये रात्री १२ वाजून १५ मिनिट ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

 

> रद्द करण्यात आलेल्या लोकल

रात्री ११.४८ वा : सीएसएमटी-कुर्ला

रात्री १२.३१ वा : कुर्ला- सीएसएमटी

पहाटे ४.५१ वा : कुर्ला-सीएसएमटी

पहाटे ५.५४ वा : कुर्ला-सीएसएमटी

रात्री ९.५४ वा : सीएसएमटी-कल्याण

रात्री ११.०५ वा : कल्याण-सीएसएमटी

 

> कुर्ला स्थानकापर्यंत चालवण्यात येणाऱ्या लोकल

रात्री १०.१८ वा : सीएसएमटी-डोंबिवली

रात्री १०.४८ वा : दादर ते डोंबिवली

रात्री ११.१२ वा : कल्याण ते दादर

 

> शुक्रवारी पहाटे ५ वाजून २४ मिनीटांची सीएसएमटी-अंबरनाथ गाडी विद्याविहार स्थानकातून पहाटे ५ वाजून ५५ मिनीटांनी सुटेल.

 

> लांब पल्ल्याच्या रद्द केलेल्या गाड्या

भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर

सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर

इंद्रायणी एक्सप्रेस (शनिवार मुंबई-पुणे ; रविवार पुणे-मुंबई)

 

जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ांची वाहतूक अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येईल. रविवारी रात्री १२. १५ ते सोमवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच दादर टर्मिनसला रात्री १२. १५ ते पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावरून वळवण्यात येईल.

 

सोमवारी रात्रीही घेण्यात येईल मेगाब्लॉक

 

सोमवारी रात्री १२.४५ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत, दादर टर्मिनसला रात्री १२.४५ ते पहाटे ४. ३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी- ठाणे ही रात्री १०.३८ वाजताची उपनगरीय गाडी आणि १२.२८ वाजताची ठाणे- सीएसएमटी गाडी, सीएसएमटी-कुर्ला रात्री १२.३१ ची गाडी रद्द करण्यात आली आहे. पहाटे ४ वाजता सुटणारी ठाणे- सीएसएमटी गाडी, कुर्ला- सीएसएमटी ही पहाटे ४.५२ आणि ५.५४ ची गाडी रद्द करण्यात आली आहे. बदलापूर- सीएसएमटी ही रात्री ९.५८ ची गाडी आणि रात्री ११.३१ ची गाडी कुर्ला स्थानकापर्यंत तर खोपोली- सीएसएमटी रात्री १०.१५ वाजताची गाडी ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल. सीएसएमटी-कसारा ही पहाटे ४.१५ ची गाडी आणि सकाळी ६.०२ वाजताची गाडी कुर्ला स्थानकातून, तर सीएसएमटी- कर्जत ही पहाटे ५.०२ वाजताची गाडी ठाणे स्थानकातून सुटेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0