काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक ; २ दहशतवादी ठार

13 Dec 2018 13:08:23

 ;

 


श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांची सुरक्षा दलासोबत चकमक झाली. २ दिवसांच्या या चकमकीमध्ये २ दहशतवादी ठार केले. ठार केलेले दहशतवादी हे 'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाची शोधमोहीम अद्याप सुरू आहे.

 

बुधवारी सायंकाळी बारामुल्लामधील ब्राथ कला गुंड परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्या चकमक उडाली होती. गुरुवारी गोळीबार थांबला, पण सुरक्षा दलाने आपली शोधमोहीम सुरूच ठेवली होती. सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. शोध मोहीम चालू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. बुधवारी सायंकाळपासून दोन्हींकडून गोळीबार करण्यात आला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0