गुगलवर अव्वल ठरली ‘ही’ अभिनेत्री

13 Dec 2018 13:52:23

 


 
 
 
नवी दिल्ली : आपल्या नजरेने आणि आकर्षक हावभावांनी अनेकांना घायाळ करणारी विंक गर्ल अर्थात अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावर्षीच्या गुगल सर्चमध्ये प्रिया अव्वल ठरली आहे. यावर्षभरात जास्तीत जास्त लोकांनी गुगलवर प्रिया प्रकाश वॉरियरचे नाव सर्च केले. याबाबतीत तिने सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या बॉलिवुड सेलिब्रिटींनादेखील मागे टाकले आहे.
 
 

 
 

प्रिया प्रकाश वॉरियर नंतर निक जोनास, सपना चौधरी, प्रियांका चोप्रा, आनंद अहुजा, सारा अली खान, मेगन मर्केल, अनुप जलोटा, बोनी कपूर यांचा क्रमांक या यादीत लागतो. या सर्वांना मागे टाकत प्रियाने देशातील गुगल सर्च च्या यादीत पहिले स्थान मिळविले. जागतिक स्तरावर मेगन मर्केलच्या नाव गुगल सर्चच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गायिका नेहा कक्करचे सत्यमेव जयते’ या सिनेमामधील ‘दिलबर दिलबर’ हे गाणे भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. गायक अरिजित सिंहचे तेरा फितूर हे गाणे आणि गायक आतिफ अस्लमचे ‘बत्तीगुल’ सिनेमातील ‘देखते देखते’ हे गाणेदेखील सर्वाधिक सर्च करण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0