रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

    दिनांक  10-Dec-2018
 
 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझ्या व्ययक्तिक कारणासाठी मी पदभार सोडत असल्याची प्रतिक्रीया उर्जित पटेल यांनी पायउतार झाल्यावर दिली आहे. 

 

राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले, माझ्या व्ययक्तिक कारणासाठी मी गव्हर्नर पदाचा त्वरीत राजीनामा देत आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या सर्वोच्च पदाचा कार्यभार सांभाळायला मिळणे हे मी माझे भाग्य मानतो. आरबीआयमधील कर्मचारी, अधिकारी आणि व्यवस्थापनाच्या मदतीने गेल्या काही काळात उत्तम कामगिरी करता आली. मी त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/