नगरदेवळा वि.का.सो.चा जलसंपदा मंत्र्यांकडून गौरव

10 Dec 2018 11:54:57

नगरदेवळा : 
 
येथील वि .का .सो .चा सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथे आयोजित सहकार मेळाव्यात सन्मानपत्र देवून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व ना. सुभाष देशमुख, सभापती सतीश शिंदे यांनी गौरव केला.
 
सहकार मेळाव्यात येथील वि.का.सो.चे सर्व पदाधिकारी यांना व्यासपीठावर बोलावून सन्मानित करण्यात आले. यावेळी चेअरमन मुन्ना परदेशी, मार्गदर्शक शिवनारायण जाधव, महेंद्रसिंग परदेशी, राकेश थेपडे, व्हा.चेअरमन रावसाहेब पाटील, मोहन तावडे, राजेंद्र महाजन, दामू गढरी, आबा महाजन, अशोक राऊळ, प्रल्हाद साबळे, बळीराम महाजन, रणजित परदेशी, भूषण जाधव, अशोक सोन्नी, सुनील तावडे, शालिग्राम गोसावी, सचिव बापू पाटील, गोरख महाले, भूषण परदेशी आदीस उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0