लोहा पालिकेत अशोक चव्हाणांना झटका

    दिनांक  10-Dec-2018
 
 

नांदेड : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले होते. अशोक चव्हाणांचा या निवडणुकीत सुफडा साफ झाला आहे. या पालिकेत रावसाहेब दानवे भाजपच्या माध्यमातून निवडणुकीचे शिलेदार होते. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा मतदार संघातील माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली.

 

सिल्लोडचे माजी मंत्री अब्दूल सत्तार, लातूरचे धीरज देशमुख, कंधार पालिकेचे नगराध्यक्ष अरविंद नळगे, विशेषत: आदिंच्या प्रचार सभा गाजल्या असतानाही त्यांचा प्रभाव किंचितही लोहा पालिका निवडणूकीत झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवला. भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार गजानन सूर्यवंशी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी आणि केशवराव चव्हाण मुकदम त्यांच्या पत्नी कल्पना चव्हाण हे उमेदवार विजयी झाले आहेत.

 
 

लोहा नगरपालिका निवडणूक निकाल

 

भाजप १३

  

काँग्रेस

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/