मराठा आरक्षण : याचिकाकर्त्या वकीलाला मारहाण

10 Dec 2018 14:36:44



 
 
 
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाबाहेर मारहाण करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी सुरु होती. या सुनावणीच्यावेळी न्यायालयात काय घडले, याविषयी गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 

त्यावेळी अचानक एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. सदावर्ते यांना मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतर वकिलांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. वकील आणि त्या व्यक्तीमध्ये झटापट झाली. वैद्यनाथ पाटील असे या व्यक्तीचे नाव असून तो जालना जिल्ह्यातील आहे. अशी माहिती त्याने प्रसार माध्यमांना दिली. याप्रकरणी वैद्यनाथ पाटील याला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0