मनपा, ‘सुप्रीम’ने साकारलेल्या स्वच्छतागृहाचे आज लोकार्पण

01 Dec 2018 14:28:54
जळगाव : 
 
शहरातील मध्यवर्ती फुले मार्केट भागात शहर पोलीस स्टेशन शेजारी महापालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज लि., गाडेगाव यांनी संयुक्तरित्या नागरिकांच्या सुविधेसाठी साकारिलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे लोकार्पण शनिवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वा. जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
या स्वच्छतागृहात स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था असून पारंपारिक भारतीय पद्धतीबरोबरच पश्चिमात्य पद्धतीच्या कमोडची सुविधाही आहे.
 
लहान मुलांसाठी ‘बच्चा टॉयलेट’ असून त्यात दरवाजा ऐवजी कार्टूनची चित्रे असलेले पडदे आहेत. प्रवेशासाठी ट्रायपॉड मशीन बसविण्यात आले असून त्या इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीचे स्वयंचलित दरवाजे आहे.
 
त्यात नाणे टाकले की, प्रवेश मिळेल. हे स्वच्छतागृह ‘पे अ‍ॅण्ड यूज’ पद्धतीने चालविले जाणार आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थितीचे आवाहन ‘सुप्रीम’ चे वरीष्ठ महाव्यवस्थापक संजय प्रभुदेसाई यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0