ना.सुभाष देशमुखांना काँग्रेस दाखवणार काळे झेंडे

01 Dec 2018 14:43:36
पाचोरा :
 
पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचा मका शासकिय हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनातर्फे कोणतेही खरेदीकेंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्‍यांचा मका हा खाजगी व्यापार्‍यांना विकावा लागत आहे.
 
बळीराजाच्या मालाला हमीभावासाठी मिळण्यासाठी शनिवारी पाचोर्‍यात येणारे राज्याचे पणन व पाटबंधारे मंत्री ना. सुभाष देशमुख यांना काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे.
 
पाचोरा भडगाव तालुक्यातिल शेतकर्‍यांचा मका व इतर धान्य शासकीय हमी भावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र तातडिने सुरू करण्यासंदर्भात तहसिलदार पाचोरा यांना कॉग्रेसतर्फे या अगोदरच निवेदन दिले आहे.
 
या निवेदनातिल विषय गांभिर्याने न घेतल्याने आज पाचाोर्‍यात ना. देशमुख हे सहकार मेळाव्यास येत असून त्यांना शेतकर्यांच्या शेतमालाला शासकिय हमीभावात खरेदी करण्यासाठीच्या खरेदीकेंद्राचा विषय कळावा. यासाठी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0