पंतप्रधानांची दिवाळी भारत-चीन सीमेवर

07 Nov 2018 13:17:37


 


जवानांना खाऊ घातली मिठाई नंतर घेतले केदारनाथांचे दर्शन


केदारनाथ : दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यासोबत दिवाळी साजरी केली. उत्तराखंडच्या भारत-चीन सीमेवरील हर्षिल या ठिकाणी जाऊन आयटीबीपीच्या जवानांसोबत वार्तालाप करून त्यांनी जवानांना मिठाई खाऊ घातली. त्यानंतर त्यांनी केदारनाथला जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले. हॅलीपॅडवरून उतरून अर्धा किलोमीटर पायी चालत जाऊन केदारनाथ मंदिरात पोहचले व शिवलिंगाचे दर्शन घेतले.

पंतप्रधान मोदी २०१४ पासून जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. जवानांबद्दलचा आपला आदर कायम राखत यावर्षी देखील मोदींनी हर्षिल येथे जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी ते म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व समर्पित केले आहे. अशा जवानांचा देशवासियांना अभिमान आहे. त्याचबरोबर त्यांनी जनावांसोबत भारत सरकारने आजी-माजी जवानांच्या कल्याणासाठी व संरक्षण क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी राबवलेल्या योजनांबाबत चर्चा केली.

जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी केदारनाथनला आले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केदारनाथला ही त्यांची तिसरी भेट आहे. यापूर्वी त्यांनी २०१७ साली दोनवेळेस केदारनाथला भेट दिली होती. जवळजवळ पाऊणे दोन तास ते याठिकाणी होते. यावेळी त्यांनी भगवान शंकराची पूजा-अर्चा केली व मंदिराला प्रदक्षणा मारली. मागील दोन वेळेस आले त्यावेळी मोदींनी फक्त रुद्राभिषेक केला होता. मात्र यावेळी त्यांनी जलाभिषेक करून केदारनाथच्या पुनर्निर्माणाच्या कामाचा आढावा घेतला.

 

 
 

केदारनाथमध्ये आल्यानंतर मोदींनी येथील नागरिकांशी वर्तलाप केला. मोदींच्या स्वागतासाठी केदारनाथच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची व रंगांची रांगोळी देखील काढण्यात आली होती. मंदाकिनी नदी नदीवरून थेट केदारनाथ मंदिरापर्यंत बनवलेल्या नवीन रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याने भाविकांना थेट मंदिरापर्यंत येता येणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी ३ टन फुलांनी मंदिर सजवले गेले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0