'प्रयागराज'नंतर आता स्टेडिअमचेही 'नामकरण'

06 Nov 2018 15:16:32


 


लखनऊ: उत्तर प्रदेशमधील शहराचे नामकरण केल्यानंतर योगी सरकारने आता स्टेडिअमचेही नामकरण केले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील इकाना स्टेडिअमचेही नाव बदलले आहे. 'इकाना' स्टेडिअमचे नाव बदलून 'भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम' असे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज उदघाटन केले आहे.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी म्हणाले की, "आम्ही फक्त क्रिकेटच नाहीतर देशातील सर्व खेळांना प्राधान्य देतो. पंतप्रधान मोदी यांचे भारताच्या खेळांसंबंधी एक मोठा दृष्टिकोन बाळगून आहेत. देशातील गावागावांमध्ये चांगली मैदान असावीत हे आमचे लक्ष आहे. त्याची सुरुवात म्हणून आम्ही गाझियाबादमध्ये लवकरच एक भव्य स्टेडियम उभारत आहोत." स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे १९९१ ते २००९मध्ये लखनऊचे खासदार म्हणून कार्यरत होते.

 

मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे. भारत आणि वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० सामन्याच्या एक रात्री आधीच हा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील अलाहाबाद या शहराचे प्रयागराज असे नाव केले होते. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाला पसंती दिली आहे.

 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0