पाच नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षादलांची दमदार कामगिरी

05 Nov 2018 12:48:21


 

ओडिशा: मलकानगिरी येथील कालीमेडामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलांना यश आले आहे. पहाटेच्या सुमारास ही चकमक घडून आली. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरु केली आहे.

 

गेल्या आठवड्यात दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान व एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. तर बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीत चार जवानांना वीरमरण आले होते. तेव्हापासून नक्षली भागात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरु केली असल्याने सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमकी वाढल्या आहेत. दरम्यान, कालीमेड येथे झालेल्या चकमकीबाबत सुरक्षा दलांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0