‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी होणार : मुख्यमंत्री

05 Nov 2018 17:05:40
 
 
 
मुंबई : सुमारे १३ जणांच्या मृत्य़ूला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पांढरकवड्यातील टी-१ या पाच वर्षांच्या वाघीणीला ठार केल्यानंतर राज्याच्या वनविभागावर टीका करण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रतिक्रीया व्यक्त केली. अवनी वाघिणीच्या मृत्यू झाल्यानंतर अवनी वाघिणीवर टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हणाले कि, “अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दुःखद घटना आहे. पण वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी केली जाईल.” 
 


पांढरकवड्यातील ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्याचे वनखात्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही राज्य सरकारवर टीका केली होती. ‘ केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले. ‘वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दु:खद बाब आहे. मनेका गांधींचे प्राणीप्रेम आम्हाला माहित असून त्यांनी कठोर शब्दात केलेली टीका आम्ही समजू शकतो. वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करुन या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का?, याचा तपास केला जाईल.’
 
 
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे सूर्यास्तानंतर कोणत्याही वन्यप्राण्याला बेशुद्ध करता येत नाही, किंवा गोळी घालता येत नाही. परिस्थिती खूपच वाईट असेल तर अपवादात्मक प्रकरणात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन तसे करता येते. वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे औषध हाताळण्याचा अधिकार भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच आहे. वाघिणीला मारण्यासाठी हैदराबादचा नेमबाज नवाब शआफ़तअली खान याला पाचारण करण्यात आले. नवाबचा मुलगा असगर याने तिला गोळी घालून ठार केले, असा आक्षेप घेतला जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0