सकल मराठा समाजातर्फे आनंदोत्सव

30 Nov 2018 15:06:08
जळगाव  :
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण हे विधेयक ठेवल्यावर सर्व सदस्यांनी बहुमताने ते 16 टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले.
 
दरम्यान, येथील शिवतीर्थ मैदानावर फटाक्याची आतषबाजी करून तसेच एकमेकांना पेढे वाटून समाजबांधवांतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी मराठा उद्योजक विकास मंडळ, नवयुवक मराठा विकास मंडळ, छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय संस्था सहभागी होत्या.
 
मनपा स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, आनंदराव मराठे, संजय जाधव, विनोद मराठे, अर्जुनराव जगताप, पंडितराव जाधव, शालिग्राम मते, विष्णू बाळदे, बाळासाहेब मते, बाळासाहेब मोझे, धनंजय बेंद्रे, दगडूशेठ मोपारी, सुधाकर मराठे, भगवान जाधव, अ‍ॅड. राजेश पावसे, अ‍ॅड.भवर, किशोर मराठे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0