सर्कशीतल्या प्राण्यांवर बंदीचा विचार

30 Nov 2018 22:11:13
 

नवी दिल्ली : लहानपणी साऱ्यांनीच घेतलेला सर्कशीतल्या प्राण्यांची कमाल पाहण्याचा अनुभव आता यापुढे घेता येणार नाही. केंद्र सरकारने सर्कशीतल्या प्राण्यांवर बंदी आणण्यासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान सर्कशीत वाघ आणि सिंहांवर यापूर्वीच प्रतिबंध घालण्यात आला आहे. दरम्यान या नंतर आता घोडा, गेंडा, हत्ती, कुत्रा आदी प्राण्यांच्या सर्कशीतल्या सहभागावर बंदी घालण्यात येणार आहे.

 

सर्कशीतल्या प्राण्यांवर बंदी घालण्यासाठीच्या मागणीसाठी प्राणी संघटनांनी बऱ्याच वर्षांपासून जोर लावला आहे. सर्कशीतल्या प्राण्यांना लहानश्या जागेत कोंडले जाते. सर्कस करताना त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांमुळे दुखापतही होते. त्यामुळे आता यापुढे केवळ माणसेच सर्कशीत कसरती करताना दिसतील.

 

गेल्या काही वर्षांमध्ये सर्कशींमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्याही घटली आहे. पशु प्रदर्शन नोंदणीकरण कायदा २०१८नुसार कोणताही प्राणी मनोरंजन आणि कसरतींसाठी पाळला जाऊ शकत नाही. पेटा संस्थेने याबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे कि, भारतही प्राण्यांच्या दृष्टीने एका संवेदनशील राष्ट्रांच्या यादीत सामाविष्ठ होईल. सर्कशीत होणारे प्राण्यांवरील अत्याचार आता थांबण्यास मदत होईल.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0