विधानसभा उपाध्यक्षपद शिवसेनेच्या पारड्यात ?

28 Nov 2018 13:19:52

 

मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या पारड्यात पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त होते. आता येत्या ३० नोव्हेंबर रोजी या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी सत्ताधारी पक्षातील शिवसेना इच्छूक होती.
 
हे पद रिक्तच ठेवण्यात आले होते. आता लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मनधारणी करण्यासाठी हे पद शिवसेनेला देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागते याची उत्सूकता राजकीय वर्तूळात सुरू आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0