पत्रकाराची हत्या करणारा ‘तो’ दहशतवादी ठार

28 Nov 2018 16:16:43
 

जम्मू : श्रीनगर येथील श्री महाराज हरीसिंह रुग्णालयातून पसार झालेला पाकिस्तानातील दहशतवादी नावेद जाटचा बुधवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी खात्मा केला. नावेदने रायझिंग कश्मीरया वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या केली होती. त्यानंतर सीआरपीएफच्या कॅम्पवरही हल्ला केला होता.

 

नावेद हा २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी अझमल कसाबनंतर जीवंत पकडला गेलेला दहशतवादी होता. मात्र, फेब्रुवारी २०१८मध्ये दहशतवाद्यांनी नावेदला पळवून नेले.म्मू इथल्या बडगामच्या छत्तरगाम गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या ठिकाणी जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी तीन जवान जखमी झाले.

 

चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी नावेद जाट मारला गेला. अद्याप दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली नाही. अद्याप शोध मोहीम सुरू असून जवानांनी घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त केला. नावेदसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. नावेद जाट हा पाकिस्तानाच्या मुलतान प्रांतातील आहे. नावेद जाट हा तोयबाचा दहशतवादी होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0