‘आधार’चे कौतुकास्पद पाऊल...

28 Nov 2018 17:25:18



 

बदलापूर : 'आधार' संस्थेने महाराष्ट्रातील मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांची एक परिषद आयोजित केली होती. दि. २४ नोव्हेंबर रोजी बदलापूर येथील संस्थेच्या कार्यालयात सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान ही परिषद पार पडली. यावेळी जळगाव, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई अशा ठिकाणांहून मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.

 

महाराष्ट्रातील मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे मिळून एक फोरम तयार करण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित केली गेली होती. छोट्या संस्थांना, मतिमंद मुलांना आणि त्यांच्या पालकांना येणाऱ्या अडचणी या फोरमद्वारे सोडवण्याचा 'आधार'चा मानस आहे.

 

काय आहे 'आधार'?

 

आधारही मतिमंद मुलांसाठी काम करणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था आहे. आधारच्या बदलापूर येथील सेंटरमध्ये जवळपास २५० मतिमंद मुले आहेत. नाशिक येथे गोठीजवळ असलेल्या आधारच्या सेंटरमध्ये ७० ते ८० मुले आहेत. आधार या संस्थेची स्थापना माधवराव गोरे यांनी केली तर नाशिक येथील आधार सेंटरची स्थापना माधवराव यांचा मुलगा विश्वास गोरे यांनी केली होती. येत्या १७ जानेवारी २०१९ ला आधारला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
Powered By Sangraha 9.0