सोलर प्रकल्पपीडित शेतकर्‍यांचेमहसूल राज्यमंत्री राठोड यांना निवेदन

26 Nov 2018 13:41:21

 
 
चाळीसगाव :
 
महसूल राज्यमंत्री येथे दौर्‍यावर आले असताना 23 रोजी कन्नडकडे जातांना बोढरे दस्तूरी फाट्यावर शंभर ते दीडशे सोलर प्रकल्पपीडित अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी महसूल मंत्री संजय राठोड यांची गाडी थांबवून मंत्रालयात कंपनीबाबत झालेल्या बैठकीची पुढील चौकशी काय ? याबाबत स्मरणपत्र दिले.
 
मंत्रालयात झालेल्या बैठकीचे पुढे काय झाले याबाबत शेतकरी बचाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी ना. राठोड यांना विचारणा केली.
 
त्यांनी शेतकर्‍यांना आश्वासन दिले की, तीन तारखेनंतर मी जिल्हाधिकार्‍यासह संबधित महसूल अधिकार्‍यांना सोबत घेऊन स्वत: प्रकल्प स्थळावर जाऊन चौकशी करतो, मागे कोकण भवन येथे झालेल्या बैठकीतील चौकशीच्या आधारे पुढील कारवाई तात्काळ करून पीडित शेतकर्‍यांना न्याय देणार असे सांगितले.
 
यावेळी शेतकरी बचाव कृती समितीचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे, अध्यक्ष अ‍ॅड. भरत चव्हाण ,सचिव भिमराव जाधव, ओंकार आबा, मारोती राठोड, सुनिल राठोड उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0