शिवसेनाच युतीबाबत सकारात्मक वाटत नाही !

26 Nov 2018 19:24:19
 

मुंबई : कधीकधी शिवसेनाच युतीसाठी सकारात्मक वाटत नाही, असे मत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यानंतर ते युतीबाबत सकारात्मक वाटतच नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वी अनेकदा पक्षाच्या झालेल्या बैठकीत आपण शिवसेना भाजप युतीचे समर्थन केले. परंतु अनेकदा त्यावरून आम्हाला लक्ष्य करण्यात आले. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यातही शिवसेनेने पंतप्रधानांना लक्ष्य केले. त्यामुळे आता शिवसेना युतीबाबत सकारात्मक असल्याचे वाटत नसल्याचे मत भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.

 

लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे ३ सर्व्हे करण्यात आले आहेत. त्यातील आम्ही १०३ अशा जागा पहिल्या ज्यावर भाजपचा जोर जास्त आहे. गेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढले होते. तसेच भाजप आणि शिवसेनाही विरोधात लढले होते. त्याचा फायदा भाजपला मिळाला होता. सर्वेक्षणातील भाजपला या १०३ जागांवर जास्त मते होती असे निदर्शनास आले होते. परंतु यावेळी परिस्थिती अगदी उलटी आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. जर शिवसेना भाजप वेगळे लढले तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल, असे ते म्हणाले. अशा काही जागा आहेत त्यावर भाजपला निवडून येणे कठीण आहे. अश्या परिस्थितीत जर पुन्हा सत्तेत यायचे असेल तर युती होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले

 
 

काँग्रेस राष्ट्रवादीला सत्ता गेल्याने अजीर्ण

 

राज्यात गेले १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतु गेली ४ वर्षे त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. सत्ता नसल्यामुळे अता त्यांना अजीर्ण होत असल्याचे ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0