‘नवसाचा गणपती’ मंदिरात उद्यापासून श्रीराम कथायज्ञ सोहळा

24 Nov 2018 12:12:48

हभप देवदत्त मोरदे महाराज करणार निरूपण


जळगाव : 
 
येथील कृषी कॉलनीतील श्री नवसाचा गणपती मंदिर येथे रविवार, 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान 13 कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक नामजप परिपूर्ण झाला असून त्यानिमित्त श्रीराम कथा तसेच यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हभप देवदत्त मोरदे महाराज हे कथेचे निरूपण करतील.
 
त्यात दररोज पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 6 वाजता नामजप प्रभातफेरी, 6 ते संध्याकाळी 7 अखंड तेरा तास नामजप तर दुपारी 1.30 ते 5.30 दरम्यान श्रीराम कथा होईल.
 
26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान सकाळी 9 वा.ग्रंथराज श्री यजुर्वेद संहिता पारायण वेदमूर्ती हभप श्रीराम महाराज जोशी (श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव) हे करतील.
 
 
30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान सकाळी 8 वा. यज्ञ सोहळा होईल. 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान दररोज रात्री 8.30 वा. हभप दिनकर महाराज कडगावकर, हभप देवनाथ महाराज, अंतुर्ली, राष्ट्रीय कीर्तनकार हभप योगेश्वर उपासणी महाराज यांचे प्रवचन होईल.
 
 
28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान सकाळी 9 ते 12 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून डॉ. रश्मी सरोदे, डॉ. भारती पाटील, डॉ. भूषण देव, डॉ. मनीष चौधरी हे रूग्णांची तपासणी करतील.
 
ग्रंथाची शोभायात्रा 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वा. निघेल तर रात्री 8.30 वा. संगीतमय सुंदरकांड होईल. 2 डिसेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
Powered By Sangraha 9.0