मातोश्री फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिरास रुग्णांचा प्रतिसाद

    23-Nov-2018
Total Views |

500 रुग्णांची तपासणी;40 जणांचा देहदानाचा संकल्प

फैजपूर ता. यावल : 
रविवार, 18 रोजी मातोश्री फाउंडेशन पिंपरुड व आश्रय फाउंडेशन यावल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर पिंपरुड फाटा, फैजपूर रोड येथे रुग्णांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले.
 
पिंपरुड व फैजपूर परिसरात मातोश्री फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप, वाचनालय आदी सामाजिक व शैक्षणिक असे उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविले जातात.
 
आज पंचक्रोशीतील फैजपूर, पिंपरुड, चिनावल, सावदा, वढोदा, भालोद, मांगी, करंजी, लिधुरी, बामणोद, बोरखेडा, न्हावी, मारुळ, आमोदा, विरोदा, वनेली, कोसगाव, कळमोदे या गावातील 500 रुग्णांची मोफत तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली.
याप्रसंगी मातोश्री फाउंडेशनतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी मातोश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या सामाजिक जडणघडण कार्य व संस्थेच्या उद्देश मांडला.
 
आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी मार्गदर्शन करून उद्घाटन केले. तसेच मोफत वैद्यकीय तपासणी आरोग्य शिबिराचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर आर. राजपूत यांनी केले.
 
याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे, डॉ.भरत महाजन, डॉ. भूषण जंगले, डॉ. ललित बोरोले, डॉ. अभिजित सरोदे, डॉ. चेतन कोळंबे, डॉ. शैलेश खाचणे, डॉ. गौरव धांडे, डॉ. पराग कोल्हे, डॉ. सचिन कोल्हे, डॉ. दिलीप भटकर, डॉ. राजेश चौधरी, डॉ. नितीन महाजन, डॉ. विलास पाटील, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. संगीता महाजन, डॉ. वृषाली पाटील, डॉ. निलेश पाटील या सर्व सेवाभावी तज्ज्ञ डॉक्टरांनी 500 रुग्णांची मोफत तपासणी केली. यात गरजू रुग्णांना मातोश्री फाउंडेशनतर्फे डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे पुरविण्यात येणार आहे.
 
 
शिबिरातील 50 रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन डॉ. कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पिटल यावलमध्ये 13 डिसेंबर 2018 रोजी करण्यात येणार आहे. मातोश्री फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत 40 जणांनी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प घेऊन प्रतिज्ञापत्र भरून दिले.
 
 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मातोश्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, बाळकृष्ण खडसे, राहुल कोल्हे, तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय सराफ, संदीप भारंबे, पप्पू चौधरी, विजय सराफ, त्रिवेणी जंगले, मोहिणीं लोहार आणि सद्भावना ज्येष्ठ नागरिक मंडळ यांनी परिश्रम घेतले.