किचन शेड नसलेल्या शाळांची माहिती मागवा

23 Nov 2018 16:03:33

सभापती पोपटतात्या भोळे यांची सूचना

 
जळगाव : 
 
शालेय पोषण आहारासाठी किचन शेड नसलेल्या शाळांची माहिती मागविण्याच्या सूचना शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे यांनी जिल्हा परिषदेच्या 22 रोजी झालेल्या शिक्षण समितीच्य बैठकीत गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या.
  
सन 2013 मध्ये पोषण आहारासाठी शाळामध्ये स्वयंपाकगृह झालेले असतानाही जिल्ह्यातील 29 शाळांमध्ये स्वयंपाकगृहच नाही, यासाठी शाळांना वंचित का ठेवण्यात आले? याबाबची माहिती मागविण्याची सूचना सभापती भोळे यांनी केली.
 
शाळा बांधकाम दुरूस्त्याचे प्रस्तावही यावेळी सदस्यांनी नामंजूर केेले. त्याबाबत अध्यक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीला शिक्षण समिती सदस्य गजेद्र सोनवणे, रवींंद्र पाटील, विजया पाटील, नंदा पाटील आदी उपस्थित होते.
 
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
 
जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून ज्या विद्यार्थ्यांना दृष्टिदोष आहे, अशा विद्यार्थ्यांवर कांताई नेत्रालयात शस्त्रक्रिया करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
 
गरीब विद्यार्थ्यांना यामुळे आधार मिळणार असल्याचे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे व्यायामशाळा बांधकामासंदर्भात ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
जिल्हाभरातील शाळांमधील पोषण आहाराचे मानधन, इंधन यांची एक कोटी 42 लाख रुपये रक्कम वितरित करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0