मंगरुळात प्रेमसंबंधाच्या संशयावरून एकाचा खून

22 Nov 2018 13:41:20

तिघांना अटक, गुन्हा दाखल



 
 
पारोळा :
 
तालुक्यातील मंगरूळ येथील एका इसमास प्रेमसंबंधाच्या संशयावरून जीवे ठार मारल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंगरूळ गावी घडली.
 
गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तसेच त्यानेच तिला पळवून नेल्याचा संशयावरून वडिलांनी कैलास यास मारहाण केली.
 
युवराज उर्फ भाऊसाहेब माधवराव पाटील याने कैलास श्रीकृष्ण पाटील 35 यास डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच सूर्यकांत उर्फ पिंटू माधवराव पाटील, समाधान उर्फ गणेश युवराज पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी पाठीवर, पोटात मारहाण केली. या मारहाणीत कैलास श्रीकृष्ण पाटील यांचा मृत्यू झाला आहे.
 
 
श्रीकृष्ण सोनू पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसात युवराज उर्फ भाऊसाहेब माधवराव पाटील, सूर्यकांत उर्फ पिंटू माधवराव पाटील, समाधान उर्फ गणेश युवराज पाटील सर्व राहणार मंगरूळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,
 
अधिक तपास अपर पोलीस अधीक्षक बच्छाव, उपविभागीय अधिकारी रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक विलास सोनवणे, पो.उ.नि.अजितसिंग देवरे, पंकज राठोड, सुनील साळुंखे, दीपक अहिरे, नरेंद्र राजपूत यांनी आरोपींना त्यांचे नातेवाईक यांना विश्वासात घेऊन घटना घडल्याच्या काही तासातच ताब्यात घेतले
आहे.
Powered By Sangraha 9.0