नंदुरबार माजी आमदार शरद गावित यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

20 Nov 2018 16:19:26
तळोदा -
सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास स्टेशन रस्त्यावरील टापु परिसरात रात्रीची गस्त घालण्यारे पोलिस उपनिरीक्षक पी.पी. सोनवणे यांच्यासह उपस्थित पोलिस कमचार्‍यांची कॉलर पकडून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी ,
 
माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते शरद गावीत यांच्या पुत्रासह दोन तरुणांविरुध्द गुन्हा नंदुरबार शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी गौरव शरद गावित, अविनाश गावित, या दोन तरुणांना अटक करण्यात आली असुन तिसरा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले
Powered By Sangraha 9.0